Saturday 21 January 2012

पशुपालन

गरीब, गरजू व अडाणी शेतकरी, शेतमजूर ह्यांच्याकडे एखाददुसरी गायम्हैस, २-३ शेळ्या, ४-५ कोंबड्या असतातच. मग ह्या असलेल्याच पशुधनाकडे थोडे लक्ष दिले, त्यांचे थोडे व्यवस्थापन केले तर हेच पशुधन घरासाठी कसा आर्थिक हातभार देऊ शकते, हे ह्या पदवी अभ्यासक्रमात शिकायला मिळते. पशुपालनामध्ये दुग्धोत्पादनाबरोबरच मांसासाठी शेळीपालन, कोंबडीपालन, बटेरपालन, ससेपालन ह्या पर्यायांवरही भर देण्यात आला आहे व मुख्य म्हणजे हे सहज व सोपेही आहे, हे दाखवून देण्याचा प्रयास आहे.

ग्रामीण भागातील लोकांना डोळ्यासमोर ठेवून त्यांच्याकडेच असलेल्या उपलब्ध साधनसामग्रीच्या आधारे, कमी पैशांमध्ये व कमी खर्चात पशुपालन कसे करायचे हे अनिरुध्दबापूंनी आखून दिलेल्या ह्या अभ्यासक्रमात आपल्याला शिकायला मिळते. त्यामुळे ग्रामीण भागातील शिक्षित अथवा अशिक्षित शेतकरी सहजरित्या पशुपालनाकडे आकृष्ट होऊ शकतो व त्याच्या आधारे आपली परिस्थिती सुधारू शकतो.

No comments:

Post a Comment